महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधान, राष्ट्रवादीचे राज्यभर निदर्शने, पाहा दिवसभरात कुठे काय घडलं - Demonstrations across maharastra

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांच्याबद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यभर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, पदाधिकऱ्यानी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सोमवारी सायंकाळी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येत अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन केले आहे. यावेळी अब्दुल सत्तार यांनी जाहीर माफी मागावी व सत्तेतुन पायउतार व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्यंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Abdul Sattar
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्या

By

Published : Nov 7, 2022, 7:40 PM IST

Updated : Nov 8, 2022, 9:30 PM IST

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांच्याबद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यभर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, पदाधिकऱ्यानी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सोमवारी सायंकाळी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येत अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन केले आहे. यावेळी अब्दुल सत्तार यांनी जाहीर माफी मागावी व सत्तेतुन पायउतार व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्यंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधान, राष्ट्रवादीचे राज्यभर निदर्शने

राज्यभर अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आंदोलन -

औरंगाबाद - राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्तार यांच्या घरावर हल्ला केला. रोजाबाग येथील घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांसोबत किरकोळ झटापट देखील झाली.

सत्तार यांचा केला निषेध व्यक्त - एका खाजगी वृत्तवाहिनीला बोलताना सुप्रिया सुळे यांना भिकर... शब्द वापरल्याने, राष्ट्रवादी संतप्त झाली आहे. हा महिलांचा अवमान आहे, असा राज्यभर रोष व्यक्त केला जात आहे. राज्यभर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आक्रमक पणे आंदोलन केले. काही ठिकाणी सत्तार यांचा पुतळा जाळून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जो सुप्रिया सुळे यांच्यावर जे वक्तव्य केले आहे. त्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पुण्यातील बालगंधर्व चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी सत्तार यांच्या प्रतिमेला काळीमा फासून जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

ठाणे - खासदार सुप्रियाताई सुळे यांना शिवीगाळ करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास चप्पलांचा हार घालून तो जाळला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी, मनुवादाचा महाराष्ट्रातील कट्टर समर्थक अब्दुल सत्तार हेच आहेत. कारण, मनुवादामध्येच महिलांना स्थान आणि किमंत नाही. अन् तोच अब्दुल सत्तार ज्या इस्लाम धर्मातून येतो. त्या इस्लाममध्येही महिलांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे हा अब्दुल सत्तार इस्लाममध्येही नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठाणे पक्ष कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी सत्तार यांच्याविरोधात कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्तार ठाण्यात आले तर त्यांचे तोंड काळे करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया - जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी अत्यंत नीच भाषेमध्ये टीका केली आहे. त्यांनी ‘भिकारचोट’ असा शब्द वापरला आहे. सत्तार यांनी काय शब्द वापरले आहेत; त्यांची संस्कृती काय आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला कळावे म्हणून आपण हा शब्द येथे वापरत आहोत. अब्दुल सत्तार हे ज्या शिव्यांच्या शाळेत आहेत ; त्या शाळेचे आम्ही सर्व मुख्याध्यापक आहोत. पण, सामाजिक जीवनात काम करीत असताना मा. शरद पवारसाहेबांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे आम्ही कधीच कोणाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत नाहीत. त्यांनी आमच्यावर तसे संस्कार केले आहेत. पण अब्दुल सत्तार यांनी जे विधान केले आहे त्यावर कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच सत्तारांनी आएएस अधिकाऱ्याचा केला होता अपमान - एका चर्चेत सहभागी झालले असताना जिल्हाधिकार्‍यांना चहा पिणार का, असे विचारल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी नाही, असे म्हटल्यावर ‘काय मग दारु पिता का’, अशी विचारणा केली होती. ही सत्तेची मग्रुरी व माज आहे. खरंतर अपेक्षा अशी होती की आएएस संघटना याची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना या बाबतचे निवेदन देईल. कारण, राज्यकर्ते हे पाहुणे असतात. पण, आयएएस हे कायमचे मंत्रालयात असतात. राज्य चालविण्यामागे त्यांचा मोठा सहभाग असतो. अशा एखाद्या दारु पिता का, हे विचारुन आयएएसचा अपमान करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. याची आयएएस अधिकार्‍यांनी गांभीर्याने नोंद घ्यायला हवी, असे आवाहन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

वृत्त उघडकीस आणणार्‍या पत्रकारास धमक्या - अब्दुल सत्त्तार यांनी केलेले हे वक्तव्य उघडकीस आणणार्‍या पत्रकारास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गौप्यस्फोटही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला. हे वृत्त ज्या पत्रकाराने हे वृत्त प्रसारीत केले. त्याला बघून घेऊ, तुझा जीव घेऊ अशा धमक्या दिल्या जात असल्याचेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केल्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता -राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नास प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध आपमानजनक उद्गार काढले. त्यांनतर पुण्यासह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अब्दुल सत्तर यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केल्याने विद्या चव्हाण आणि मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून कफ परेड पोलिसांनी विद्या चव्हाण आणि मेहबूब शेख या दोघांचाही जबाब नोंदवला आहे.

अब्दुल सत्तार यांच्यावरिधोत तक्रार दाखल - अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध भां. द. वि. 354, 509, 506 , 153 (अ) अन्वये गुन्हा दाखल करणेबाबत लेखी तक्रार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते वकील अमोल मातेले यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात दिली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अपमानजनक उद्गार काढले आहेत. त्यांनी काढलेले उद्गार हे महिलेचे मनास लज्जा उत्त्पन करून, अपमान करणारे तसेच सामाजिक प्रतिष्ठा मलिन करणारे आहे. त्याचप्रमाणे अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध तात्काळ भा.दं वि. 354, 509, 506, 153 (अ) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी विनंती या तक्रारीतून करण्यात आली आहे.



नंदुरबार - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जोरदार निषेध करीत त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे विविध घोटाळ्यात सहभाग आहे त्यामुळे त्यांना कृषिमंत्री पदावरून हकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यासह युवक काँग्रेसचे सिताराम पवारा, नितीन जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तळोदा येथे राष्ट्रवादी महिलातर्फे आंदोलन - प्रसार माध्यमांसमोर बोलत असतांना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा तोल जाऊन त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे प्रतिसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले आहे. तळोदा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला चप्पल मार आंदोलन करण्यात आले आहे. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळोदा नगरपालिकेच्या नगरसेविका अनिता परदेशी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

जिल्ह्यात ठिकठिकाणी चोक बंदोबस्त - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल जिल्ह्यात तीव्र प्रतिसाद उमटत आहे. यादरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने व आंदोलने सुरू आहेत. या ठिकाणी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने चोक बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठल्याही विपरीत घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे.


पुण्यात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात तक्रार दाखल - राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अतिशय खालच्या भाषेत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यभर याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचाच पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कोथरूड युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरणानी यांनी तक्रार दाखल केली आहे.

यावेळी पोलिसांना त्यांनी पुरावा म्हणून व्हिडिओची क्लिप कोथरूड पोलिसांकडे सुपूर्द केली आहे. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप व बाळासाहेब बडे यांच्या कडे दिले आहे. कोथरूड राष्ट्रवादी युवक वतीने संघटक सचिव केदार कुलकर्णी आणि उपाध्यक्ष सुनील हरळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले या वेळी कोथरूड राष्ट्रवादी युवकचे अनेख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थिती होते.

सातारा - खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या सातारा जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी भवनसमोर कार्यकर्त्यांनी मंत्री सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळला. पाटणमध्येही बॅनरला जोडे मारत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.


राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी -सुप्रियाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ईडी सरकारचे करायचे काय.. खाली मुंडी वर पाय.. पन्नास खोके, एकदम ओके, अशा घोषणा देण्यात आल्या. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सत्तारांचा निषेध करून त्यांच्या बॅनरला जोडे मारण्यात आले. साताऱ्यातील आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनिल माने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजा काळे, स्मिता देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


पन्नास खोकेवाले वैफल्यग्रस्त - माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. महाराष्ट्र हे महिलांचा आदर करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जाणारे आणि दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. सध्याचे सत्ताधारी ज्या मार्गाने सत्तेत आले आहेत. ते जनतेला आवडलेले नाही. या मंडळींनी ५० खोक्यांचा कलंक मान्यच केला आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून अब्दुल सत्तारांसारखी मंडळी संतापजनक वक्तव्य करत आहेत. अशा प्रकारचे राजकारणी महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने राजकारणात राहणे योग्य नाही. त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी त्यांना राजकारणातून बाजूला करावे , अशी मागणीही आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी उरणमध्ये जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह सर्व विरोधी पक्षांनीही तीव्र निषेध केला आहे.

सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त करूनही निषेध सुरूच - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना तत्काळ माफी मागण्यास सांगितले होते. वाढता वाद पाहून मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या वक्तव्यावर दु:ख व्यक्त करत माझ्या वक्तव्याने कोणाचे मन दुखावले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, असे म्हटले असतानाही राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी जेवढे पक्ष बदलले तेवढे सरडाही आपले रंग बदलत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. अशा लोकांना कसे बोलावे तेच कळत नाही, मग कशाला अर्थ नसताना तोंड उघडतात.

सत्तारांना कुठेही फिरू देणार नाही - अब्दुल सत्तार यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही त्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला. ते जिथे जातील तिथे जाऊन आम्ही त्यांचा कार्यक्रम करू. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर झलक दाखवलीच आहे असेही पाटील म्हणाले. तर दुसरीकडे, 50 खोके देऊन भाजपने या लोकांची मने बिघडवली असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिला सचिव भावना घाणेकर यांनी केली आहे. जर हे लोक योग्य मार्गावर आले नाहीत तर आम्ही त्यांना मार्गावर आणू. राज्यातील शेतकरी आणि तरुणांनी हजारो प्रश्न उपस्थित केले असताना त्यावर काहीही न बोलता हे लोक बेताल वक्तव्य करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही घाणेकर म्हणाल्या.

Last Updated : Nov 8, 2022, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details