मुंबई: रेखा खरटमोल या आरोग्य सेविका म्हणून काम करतात. २३ जानेवारी रोजी त्या नेहमीप्रमाणे चेंबूर येथील आयोध्या नगर आरोग्य केंद्रात आल्या. तेथून दिलेल्या आपल्या कामासाठी गेल्या. मात्र त्यानंतर त्या आरोग्य केंद्रात परत आल्या नाहीत. त्या घरीही पोहचल्या नसल्याने कुटंबियांनी त्यांचा शोध घेतला. कुटुंबियांनी आरोग्य विभाग आणि आरोग्य केंद्रात याबाबत विचारणा केली. मात्र त्यानंतरही त्यांचा पत्ता लागलेला नाही. यामुळे रेखा खरटमोल बेपत्ता झाल्याची तक्रार आरसीएफ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
तक्रार करूनही दुर्लक्ष:रेखा खरटमोल या बेपत्ता झाल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडेही करण्यात आली आहे. खरटमोल यांनी कुठे भेटी दिल्या, याची माहिती त्या ज्या विभागात गेल्या त्या ठिकाणाहून मिळू शकते. मात्र आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही पोलीसांना खोटी माहिती दिली. त्यामुळे पोलीसांनी हे प्रकरण गंभीर घेतलेले नाही. यामुळे रेखा खरटमोल यांचा अद्याप शोध लागलेला नसल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी दिली.
पोलीस स्टेशनवर देणार धडक:रेखा खरटमोल बेपत्ता झाल्याची तक्रार करूनही अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागानेही हे प्रकरण गंभीरतेने घेतलेले नाही. यामुळे हजारो आरोग्य सेविकांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. रेखा खरटमोल यांचा शोध घेण्यासाठी आरसीएफ पोलीस स्टेशनवर एम ईस्ट व एम वेस्ट वार्डच्या सर्व आरोग्य सेविका महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस अॅड. विदुला पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करणार असल्याचा इशारा अॅड. प्रकाश देवदास यांनी दिला आहे.
बेपत्ता झालेल्या सदिच्छा सानेचा शोध : सदिच्छा साने 22 ही वांद्रे बँड स्टँड येथून बेपत्ता झाल्यानंतर अंगरक्षक मिठू सिंग याला गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अटक केली होती. दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षाला शिकत होती. २९ नोव्हेंबर २०२१ ला ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली पण ती परतलीच नव्हती. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला होता. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविेण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरून तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बँड स्टॅन्ड येत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती.
हेही वाचा: Palamu Accident : भरधाव स्कॉर्पिओने चिमुकल्यांना चिरडले; चार चिमुकल्यांचा करुण अंत, चालकाचाही मृत्यू