मुंबई : मंंत्रीचंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्या (Indecent remarks against celebrities) विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार (demand to register offense under Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता मागणी करण्यात आली होती. घाटकोपर येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते गेले असता गुन्हा दाखल करून घेतला नाही. या विरोधात संबंधित गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना मेलद्वारे सांगून सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Case Under Atrocities Act : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; न्यायालयात धाव - मंत्री चंद्रकांत दादा पाटील
राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी पुण्यातील एका खाजगी कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात अशोभनीय वक्तव्य (Indecent remarks against celebrities) केले. यामुळे त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार (demand to register offense under Atrocities Act) त्यांच्यासह इतर सहआरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणी करिता मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष ॲट्रॉसिटी कोर्टात धाव घेण्यात आली आहे. या मागणीवर 20 डिसेंबर मंगळवार रोजी सुनावणी होणार आहे.
![Case Under Atrocities Act : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; न्यायालयात धाव Case Under Atrocities Act](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17235333-thumbnail-3x2-mumbaisessioncourt.jpg)
भीम आर्मीची मागणी :भीम आर्मीच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह इतर म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राम कदम, मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच घाटकोपर मधील पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी :या सर्व आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याच्या विशेष न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या सर्व आरोपींनी विरोधात कलम 3(1)(r)(u)(v), 3(2) (va)(vii) SC/ST (POA) कायदा 1989 r/w सुधारणा कायदा, 2015, आणि कलम १५३, १५३(अ), 120(B), 504, 167(A) R/W 34 OF IPC, 7(1)(a)(b)(d), 7(2)(10) नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीवर मंगळवारी 20 डिसेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीस ए पी कनाडे यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.