महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 4, 2022, 7:35 PM IST

ETV Bharat / state

KEM रुग्णालयाच्या दुरुस्तीवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेचे (Mumbai Municipal Corporation) परेल येथे केईएम रुग्णालय आहे. या रुग्णालयात १०३ इमारती आहेत. यामधील काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. एकीकडे इमारती धोकादायक झाल्या असताना, गेल्या काही वर्षे इमारतींच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यावर करोडो रुपये खर्च होत असताना दुसरीकडे मात्र दुर्घटनांचे सत्र सुरू आहे.

KEM Hospital In Mumbai
KEM Hospital In Mumbai

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे (Mumbai Municipal Corporation) परेल येथे केईएम रुग्णालय आहे. या रुग्णालयात १०३ इमारती आहेत. यामधील काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. एकीकडे इमारती धोकादायक झाल्या असताना, गेल्या काही वर्षे इमारतींच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यावर करोडो रुपये खर्च होत असताना दुसरीकडे मात्र दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. यामुळे केईएम रुग्णालयाच्या KEM Hospital दुरुस्ती कामाच्या केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी माजी नगरसेवकांकडून केली जात आहे.

केईएम मधील दुर्घटना केईएम रुग्णालयाची स्थापना ब्रिटिश काळात १९२६ रोजी झाली. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचा हेरिटेज वास्तूंच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. याच परिसरात छोट्या मोठ्या १०३ इमारती आहेत. रुग्णालयात दिवसाला हजारो रुग्ण भेट देतात. याच रुग्णालयात मार्च २०१८ मध्ये दुस-या मजल्यावरील प्लास्टर आणि एसी सिलिंग पडल्याने अपघात झाला होता. त्यात 2 रुग्णांना किरकोळ खरचटले होते. इमारत खूप जुनी असल्याने या इमारतीची दुरुस्ती केली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच स्लॅब कोसळल्याने या विभागातील रुग्णांना शिफ्ट करण्य़ात आले. ३ नोव्हेंबर रोजी शिकाऊ नर्सच्या क्वार्टर्समधील सिलिंगचा भाग कोसळला. यात शिकाऊ नर्ससाठी जेवण बनवण्यास आलेल्या संगीता चव्हाण वय ४० वर्षे या जखमी झाले होते. याआधी फॅनसह स्लॅब कोसळला होता.

खर्चावर श्वेतपत्रिका काढावी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त I A कुंदन असताना केईएम मधील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी केली होती. कोरोनाचा प्रसार सुरु होण्यापूर्वी म्हणजेच २०२० पूर्वी सुमारे ८० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यावेळी ४० इमारती धोकादायक सी २ मध्ये, तर २ इमारती अतिधोकादायक सी १ कॅटेगरीमध्ये समावेश झाल्या होत्या. पालिका प्रशासन रुग्णालयाच्या कामासाठी करोडो रुपयांचा निधी देत आहे. मात्र दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरु आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना धोकादायक इमारती पाडून नव्याने २२ मजली 2 टॉवर उभारण्याची मागणी केली होती. नव्या इमारतीमध्ये ओपीडी आणि रुग्णालय सुरु करता आले असते. मात्र तसे झालेले नाही. यामुळे पालिकेने केईम रुग्णालयाच्या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जाहीर करावा. तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या खर्चावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे.

दुरुस्तीची मागणी सिलिंगचा भाग कोसळताच तातडीने स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या समवेत परिस्थितीची पाहणी केली आणि तेथील विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत तातडीची बैठक आयोजित करून त्वरित दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला सांगितले आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना केली आहे. दुरुस्तीबाबत गेल्या २ ते ३ वर्षे सतत पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन आणि के ई एम रुग्णालय प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्न माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उपस्थित केला आहे.

केलेल्या खर्चाची माहिती समोर आणा केईएम रुग्णालयात गेल्या कित्तेक वर्षे दुरुस्तीचे काम सूर आहे. हे काम अद्याप संपलेले नाही. यामुळे किती काम केली. त्यावर किती खर्च केला. याची सविस्तर माहिती पालिका प्रशासनाने नागरिकांच्या समोर आणण्याची गरज आहे. तसे पत्र पालिका प्रशासनाला दिल्याचे भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

आरोग्याच्या तरतुदीमध्ये १५० टक्क्यांनी वाढ मुंबई महापालिकेने यंदा जंबो बजेट सादर केले आहेत. २०२२- २३ या आर्थिक वर्षासाठी पालिकेने ४५ हजार ९४९.२१ कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. त्यापैकी १५ टक्के म्हणजेच ७ हजार कोटी आरोग्यासाठी तरतूद केले आहेत. आरोग्याच्या तरतुदीमध्ये मागील वर्षापेक्षा १५० टक्यांनी वाढ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details