मुंबई- दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. येथे दररोज तीन ते चार हजार लोक लसीकरणासाठी येत असतात. परंतू दुपार झाल्यानंतर कडक उन्हामुळे नागरिकांना उन्हात उभे रहावे लागते. त्यामुळे जम्बो कोविड सेंटरच्या बाहेर लसीकरणासाठी येणाऱ्या व वरिष्ठ नागरिकांसाठी पाणी वितरण तसेच शेड बनवण्याची मागणी करण्यात येत आहे.
जम्बो कोविड सेंटरबाहेर पाणी वितरण तसेच शेड उभा करा; नागरिकांची मागणी - Dahisar Jumbo Covid Center news
दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरण घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातच सामाजिक अंतर यावरसुद्धा निर्बंध लागत नाही. तर काही नागरिकांना चक्कर येण्याचे प्रमाण वाढले आहे.
![जम्बो कोविड सेंटरबाहेर पाणी वितरण तसेच शेड उभा करा; नागरिकांची मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:08:06:1619530686-31-mh-mhc10078-dahisar-27042021161254-2704f-1619520174-996.jpg)
लसीकरण घेणाऱ्यांची संख्येत वाढ
दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीकरण घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातच सामाजिक अंतर यावरसुद्धा निर्बंध लागत नाही. तर काही नागरिकांना चक्कर येण्याचे प्रमाण वाढले आहे. दहीसर पोलीस लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येकाला लाऊड स्पीकरच्या माध्यमातून कुपन घेऊन बाजूला होण्यासाठी सांगत आहेत. आरपीआयचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड आणि दहिसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी मंगळवारी दुपारी लसीकरण घेणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याचे वितरण केले. बीएमसी आणि स्थानिक आमदार यांनी दहिसर कोविड सेंटरला हायवेपर्यंत शेड लावला पाहिजे आणि मोफत पाणी वाटप केले पाहिजे, अशी मागणी रमेश गायकवाड यांनी केली आहे.