मुंबई- 2008 मधील मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भातील सर्व मुख्य आरोपींच्या वकिलांनी एनआयए कोर्टात याचिका दाखल करत पोलीस सुरक्षा मागितली आहे. आरोपींच्या सर्व वकिलांना मालेगाव येथे झालेल्या बॉम्ब स्फोटासंदर्भात घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण करायचे असल्याने यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीत मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भात जखमींची उलटतपासणी करण्यात आली. मागच्या सुनावणीत एनआयए कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपीना आठवड्यातून एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजच्या सुनावणीत एकूण आरोपींपैकी फक्त समीर कुलकर्णी हा आरोपी हजर होता.