महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभियांत्रिकीच्या नवीन शाखांना मागणी ४० हजार जागांना मान्यता - अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद

अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पारंपरिक शाखांमधील प्रवेश घटत असताना नव्याने उदयाला येणाऱ्या शाखांना मात्र मागणी वाढत आहे. यामुळे या महाविद्यालयांनीही कात टाकण्यास सुरुवात केली आहे. परिणामी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने तब्बल ४० हजार जागांना मान्यता दिली आहे.

न

By

Published : Feb 14, 2022, 10:10 PM IST

मुंबई -अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पारंपरिक शाखांमधील प्रवेश घटत असताना नव्याने उदयाला येणाऱ्या शाखांना मात्र मागणी वाढत आहे. यामुळे या महाविद्यालयांनीही कात टाकण्यास सुरुवात केली आहे. परिणामी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने तब्बल ४० हजार जागांना मान्यता दिली आहे.

अशा आहेत शाखा निहाय जागा -देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील रिक्त जागांचे वाढते प्रमाण ही मोठी समस्या बनली होती. यामुळे अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये नवीन शाखांचा उदय होणे आवश्यक होते. यानुसार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने गेल्या काही वर्षांत अनेक धोरणात्मक बदल केले. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्ससारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला. यामुळे नवीन कॉलेजे सुरू करण्यावर बंदी असली तरी सध्या अस्तित्त्वात असलेल्या कॉलेजांमध्ये मागणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता देण्यात येत आहे. यंदा कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशील लर्निंग या विषयाला सर्वाधिक १३ हजार ९५० जागांना मान्यता दिली आहे. त्यानंतर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा सायन्स या विषयाला ११ हजार ४० जागांना परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर गेल्या काही वर्षात मॅकेनिकल अभियांत्रिकीच्या सुमारे ११ हजार तर सिव्हील अभियांत्रिकीच्या सुमारे १० हजार जागा घटल्याचेही परिषदेने दिलेल्या आकडेवारीत समोर आले आहे.

नवीन शाखांची मोठी मागणी -सध्या अभियांत्रिकीच्या नवीन शाखांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या अभ्यासक्रमातून पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने विद्यार्थी याला पसंती देत आहेत. असे असले तरी पारंपरिक शाखाही बंद होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. मुंबईतीलही काही महाविद्यालयांनी अभियांत्रिकीच्या नवीन शाखांचा पर्याय स्वीकारला आणि बायोटेक्नॉलॉजी आणि बायोमेडिकल अभियांत्रिकी यासारख्या शाखा बंद केल्या आहेत.

हेही वाचा -Anil Deshmukhs Lawyer Argument : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री असल्याने अडकवले जात आहे- अनिल देशमुखांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद

ABOUT THE AUTHOR

...view details