महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कोरोनाच्या अतिघातक Delta Plus विषाणूचे नवे २१ रुग्ण सापडले - डेल्टा प्लस

महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत.

Delta Plus virus found 21 new cases
राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे नवे २१ रुग्ण

By

Published : Jun 22, 2021, 10:28 AM IST

Updated : Jun 22, 2021, 2:02 PM IST

मुंबई -राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी येथे दिली.

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे नवे २१ रुग्ण

आतापर्यंत ७५०० नमुने घेण्यात आले -

या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत.

केसेस बाबत संपुर्ण माहिती घेतली जात आहे -

या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की, या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का, याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासिताची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे. त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा - कोरोनाचा 'डेल्टा प्लस' स्ट्रेन आहे घातक; औषधांच्या परिणामाबाबतही साशंकता..

Last Updated : Jun 22, 2021, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details