मुंबई -श्रद्धा खून प्रकरणाच्या ( Shraddha murder case ) तपासासाठी मुंबईत तळ ठोकून असलेले दिल्ली पोलिसांचे पथक, आरोपी आफताब पूनावालाने काम केले त्या पंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करणार ( Delhi Police Investigate hotel staff Aftab worked ) आहे. प्रशिक्षणार्थी आचारी म्हणून त्याने या हॉटेलमध्ये काम केले होते. दिल्लीचे दोन पोलिस अधिकारी कर्मचार्यांना आफताबबद्दल विचारपूस करतील, तर एक अधिकारी पालघरमधील वसईत तपास करेल.
जबाब नोंदवणे सुरू : याआधी रविवारी, दिल्ली पोलिसांच्या पथकाने आफताब त्याच्या कुटुंबासह राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाचे जबाब ( Shraddha murder case started statement Recording ) नोंदवले. एक तासाहून अधिक काळ जबाब नोंदवले गेले. आफताबच्या कुटुंबाने त्यांचे घर 20 दिवसांपूर्वी रिकामे केले होते. आफताबचे कुटुंब कुठे गेले याबद्दल माहिती नाही आणि त्यांनी शेअर केलेला नंबर देखील बंद आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धा आणि आफताबच्या मित्र आणि नातेवाईकांसह अनेकांना बोलावले असून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.