मुंबई -केतन कक्कड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केलेल्या बदनामी विरोधात आणि सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करण्यासाठी उच्च न्यायालयात सलमान खानने धाव घेतली होती. यापूर्वी सत्र न्यायालयाने सलमान खानची याचिका फेटाळून लावली होती. सलमान खान याने दाखल केलेल्या याचिकेत, केतन कक्कड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले व्हिडिओ तत्काळ डिलीट करण्यात यावेत अशी मागणी केली होती. तर सलमान खानच्या विरोधात सर्व पुरावे असल्याचा युक्तिवाद केतन कक्कड यांच्यावतीने करण्यात आला होता. दोन्हीही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता. आज या संदर्भात निकाल देण्याची शक्यता आहे, त्यामुळे सलमान खान यांना दिलासा मिळणार की, नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका यूट्युब वाहिनीला मुलाखत दिली होती - सुनावणीदरम्यान केतन कक्कड यांचे वकील आदित्य प्रताप सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात म्हटले, की सलमान खान विरोधात कक्कड यांनी केलेल्या आरोपासंदर्भात प्रथम दृष्ट्या त्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे सलमान खान यांनी केलेली याचिका फेटाळण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानने मुंबई उच्च न्यायालयात पनवेलच्या फार्महाऊस परिसरातील जमिनीच्या वादाबाबात शेजारी केतन कक्कड यांनी समाज माध्यमावर बदनामीकारक पोस्ट टाकण्यास मनाई करावी, तसेच पोस्ट डिलीट करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. केतन कक्कड यांचा जमिनीबाबत सलमान खानशी वाद झाला होता. याबाबत कक्कड यांनी एका यूट्युब वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात सलमान आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात बदनामी करणारे आरोप करण्यात आले होते, असे देखील याचिकेत म्हटले आहे.
आक्षेपार्ह कंटेट काढून टाकला जावा - संबंधित व्हिडीओ समाज माध्यवावरून हटवावा आणि असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी त्यांना मनाई करावी अशी मागणी सलमान खाने केली आहे. यासंदर्भात सलमानने यापूर्वी शहर दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात अपील केले आहे. समाज माध्यमावर होणारी मानहानी आणि अप्रतिष्ठा आधारहीन आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे. सलमान खानने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर बोलताना आपल्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यामुळे माझ्याबद्दल असलेला हा आक्षेपार्ह कंटेट काढून टाकला जावा आणि ज्या प्लॅटफॉर्मवर हा कंटेट उपलब्ध आहे ते ब्लॉक केले जावे अशी मागणी सलमान खान ने याचिकेत केली आहे. त्यासोबतच सदर व्हिडीओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याप्रकरणी ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही सलमाननं प्रतिवादी केले आहे.
किर्तन क्ककड चा व्हिडिओ आरोप काय -किर्तन क्ककड यांनी व्हिडीओ पोस्ट आणि ट्विटरवरून केलेले आरोप हे खोटे अपमानास्पद आणि बदनामी असून, त्यामुळे सलमान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा सलमानच्यावतीनं बाजू मांडताना केला गेला. मुळात सलमान आणि एनआरआय असलेल्या कक्कडमध्ये जागेच्या अतिक्रमणावरून वाद आहे. मात्र, कक्कड यानं केलेले हे सर्व आरोप वैयक्तिक पातळीवरचे आहेत. चाईल्ड ट्रॅफिकिंग, ड्रग ट्रॅफिकिंग, बलात्कार, सुशांत सिंगला ठार मारले, अंडरवर्ल्डशी संबंध, लँड माफिया, दहशतवादी असे अनेक आरोप कोणताही पुरावा नसताना कक्कड यांच्याकडून केले गेले आहेत. तसेच, या प्रकरणाला धार्मिक रंगही देण्याचा प्रयत्नही केला गेला आहे. असा आरोपही सलमानच्यावतीने कोर्टात करण्यात आला आहे.