मुंबई- सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात असताना बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आलेले आहे. त्यानुसार आज बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण , श्रद्धा कपूर , सारा अली खान या तिन्ही अभिनेत्री एनसीबी पथकासमोर चौकशीसाठी हजर होत आहेत. दीपिका पदुकोण ही आज चौकशीसाठी कार्यालयात हजर झाली आहे. दरम्यान काल रकुल प्रीत सिंह आणि करिष्मा यांची एनसीबीने चौकशी केली आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
दीपिका एनसीबी कार्यालयात हजर; सारा अली खान आणि श्रद्धा कपूरही लावणार हजेरी - दीपिका पदुकोण चौकशी
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आज एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांची चौकशी केली जाणार आहे. 2017 मध्ये दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा यांच्या दरम्यानचा व्हाट्सअप चॅट समोर आल्यानंतर या संदर्भात दीपिका पदुकोणला समन्स बजावण्यात आलेले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला समंन्स पाठविण्यात आल्यानंतर एनसीबी कार्यालयांमध्ये दीपिका पदुकोण ही हजर झालेली आहे. दीपिका पदुकोण ही चौकशी सुरू करण्यात आली असून ही चौकशी किती वेळ चालणार आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. याबरोबरच दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रसाद हिलासुद्धा एनसीबी कार्यालयांमध्ये बोलवण्यात आले असून दीपिका पदुकोण व करिष्मा या दोघांच्या मध्ये 2017 साली झालेले व्हाट्सअप चॅट घेऊन चौकशी करण्यात येणार आहे.
या व्हाट्सअप चॅट मध्ये दीपिका पदुकोने करिश्माला गांजा मिळेल का म्हणून अशा प्रकारचे व्हाट्सअप केले होते. त्यावर करिष्मा हिने मिळेल, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल असे म्हटलं होते. शुक्रवारी दीपिका पदुकोणची मॅनेजर करिष्मा हिची चौकशी केल्यानंतर शनिवारी पुन्हा तिला चौकशीसाठी बोलवले आहे. दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा यांना समोरासमोर बसवून एनसीबी चौकशी करणार आहे.