मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील अमली प्रदार्थ संबंधात एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) आज दीपिका पदुकोणची तब्बल 5 तासाहून अधिक चौकशी झाली. दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा प्रसाद या दोघींचीही समोरासमोर बसून चौकशी करण्यात आलेली आहे. दीपिकाने हे व्हॉट्सअॅप चॅट करिष्मा प्रकाश सोबत झाल्याचं मान्य केलेल आहे. मात्र, हे चॅट अमली पदार्थांसाठी नसल्याचे दिपीका व करिश्मा यांनी एनसीबीला सांगितलं आहे. आम्ही एखाद्या विड , हॅश नावाचे कोड वापरून संवाद साधायचो. मात्र, अमली पदार्थाचा याच्याशी संबंध नसल्याचे दोघांनी म्हटलं आहे. तथापि, दीपिकाच्या उत्तरांवर एनसीबी असमाधानी असल्याची माहिती आहे. त्यामुळे दीपिकाला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकशीदरम्यान, 2017 साली दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा यांच्यादरम्यान झालेल्या व्हाट्सअप चॅट बद्दल काही प्रश्न दीपिका पदुकोण व करिश्मा या दोघांना विचारण्यात आले. या व्हाट्सअप मध्ये दीपिका पादुकोण हिने अमली पदार्थांची मागणी केली होती? आणि त्याबद्दल पुढे काय झाले ? अशा प्रकारचे बरेच प्रश्न एनसीबीकडून दीपिका पदुकोणला विचारण्यात आले.
दीपिका पदुकोणला समन्स बजावण्यात आल्यानंतर दीपिकासोबत हजर राहण्याची परवानगी पती रणवीर सिंग याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र, यासंदर्भात एनसीबी अधिकाऱ्यांनी रणवीर सिंग त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे दीपिका पदुकोण ही तिच्या बॉडीगार्डसोबत एनसीबीच्या कार्यालयात सकाळी 9 वाजून 50 मिनिटांना हजर झाली होती.