मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतकडे हाऊसकिपिंगचे काम करणारा दीपेश सावंत याला एनसीबीने साक्षीदार बनवले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. सध्या एनसीबीकडून दीपेश सावंतचा जबाब नोंदवला जात आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : एनसीबीकडून दीपेश सावंत होणार साक्षीदार - Deepesh Sawant sushant housekeeper
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून तपास केला जात आहे. याच प्रकरणात ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचा संशय आल्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स सिंडिकेट असल्याचा संशय आहे. त्यानुसार एनसीबीकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांनी शुक्रवारी एनसीबीने अटक केली. त्यानंतर दीपेश सावंत याला साक्षीदार बनवण्यात आले आहे.
दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेला जैद याने एनसीबी चौकशीदरम्यान शोविकला अमली पदार्थ पुरविल्याचे कबूल केले आहे. सुशांतसिंह याच्या मृत्यूनंतरही जुलै महिन्यात सॅम्युअल मिरांडाला अमली पदार्थ दिल्याची कबुली जैद याने दिली आहे. यासाठी सॅम्युअलने त्याला जे पैसे दिले होते ते शोविक चक्रवर्तीने पाठवले असल्याचे जैद याने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.