मुंबई -ठाकरे आणि शिंदे ( Thackeray vs Shinde ) गटाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court Hearing On Thackeray Faction ) 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले आहे. संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांनी शिंदे गटाला यावरून सूचक इशारा दिला. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आगामी काळात कोसळणार असल्याचे संजय राऊत ( Deepak Kesarkar Criticize To Sanjay Raut ) यांनी स्पष्ट केले. मात्र शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपली भविष्यवाणी ( Sanjay Raut Predictions ) सुधारावी, असा चिमटा दीपक केसरकर यांनी राऊतांना काढला आहे.
ठाकरे गटाने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेराज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणात 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून आजही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी 2023 ला होणार आहे. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी यावरून शिंदे गटाला डिवचले आहे. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले.