मुंबई - मुंबईतील कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र बनलेल्या धारावीतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत रुग्णांची संख्या घटली असून शुक्रवारी येथे 25 रुग्ण आढळले. ही घट अशीच राहिली तर धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येईल. मात्र, त्याला वेळ लागेल. अद्यापही धोका टळला नसून पुढील आठवड्याभरात काय परिस्थिती राहते? यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत, असे महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; मात्र, धोका टळलेला नाही - मुंबई कोरोनाबाधित
धारावीतील रुग्णांचा आकडा फुगताच होता. 80 ते 90 ने संख्या वाढत होती. तर मृत्यू ही वाढत होते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांत रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. शुक्रवारी येथे 25 रुग्ण आढळले आहेत. हा आकडा दिलासा देणारा असला तरी पुढचे किमान 8 दिवस काय परिस्थिती राहते, यावर सर्व अवलंबून असल्याचे दिघावकर यांनी सांगितले आहे.
साडेसात लाख लोकसंख्या असलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने विशेष आराखडा तयार करत स्क्रिनिंग आणि चाचण्यांच्या संख्येत वाढ केली. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ची देखील साथ मिळाली. धारावीतील हॉटस्पॉट शोधून काढत नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यातून लक्षणे असलेल्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन तसेच होम क्वारंटाइन करण्यात आले. मात्र, त्यानंतर धारावीतील रुग्णांचा आकडा फुगताच होता. 80 ते 90 ने संख्या वाढत होती. तर मृत्यू ही वाढत होते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांत रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. शुक्रवारी येथे 25 रुग्ण आढळले आहेत. हा आकडा दिलासा देणारा असला तरी पुढचे किमान 8 दिवस काय परिस्थिती राहते, यावर सर्व अवलंबून असल्याचे दिघावकर यांनी सांगितले आहे.
सध्या 800 हून अधिक रुग्ण येथे असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 520 नागरिक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत, तर 13 हजार नागरिक होम क्वारंटाइन असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले आहे. आजही ठिकठिकाणी स्क्रिनिंग सुरू आहे. खासगी क्लिनिकची देखील मदत मिळत असून तिथे ही स्क्रिनिंग करत लक्षणे असलेल्यांना क्वारंटाईन केले जात आहे. यापुढे येथे कडक नियम पाळत संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले आहे.