मुंबई- कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. भारतातील तिसऱ्या टप्प्यातील कालवधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या दरम्यान लॉकडाऊनमध्ये महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. मात्र, घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांना दाद मागण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे पोहोचणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे. कारण, लॉकडाऊन दरम्यान राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आता र्यंत राज्यभरातून एकूण 107 तक्रारी या ईमेलच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागातून 12, अमरावती विभागातून 7, नाशिक 12, पुणे विभागातून 20, कोकण विभागातून 154, नागपूर विभागातून 4 तर मुंबईतून 24 घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या बरोबरच राज्य महिला आयोगाकडे 14 अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्यात जिल्हा किंवा विभागाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.