महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकल सर्वांसाठी सुरू होणार ? आज होणार निर्णय - mumbai local news

आत्तापर्यंतच्या अनलॉकच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या असून लोकल रेल्वे सामान्य जनतेसाठी खुली करण्यामध्ये काय अडचण आहे? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती.

लोकल सर्वांसाठी सुरू होणार ? आज होणार निर्णय
लोकल सर्वांसाठी सुरू होणार ? आज होणार निर्णय

By

Published : Jan 13, 2021, 10:04 AM IST

मुंबई-कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सामान्य जनतेसाठी बंद ठेवण्यात आलेली लोकल रेल्वे ही लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून काम केले जात असून बुधवारी सामान्य जनतेसाठी लोकल सुरू होणार का? याबाबतचा खुलासा राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात करणार आहे. लोकल रेल्वे सर्वांसाठी कशा प्रकारे सुरू करण्यात येईल ? गर्दीचे नियंत्रण कसे करता येईल ? व करोना संक्रमणाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून काय उपाय योजना करण्यात याव्यात? याविषयी उच्चस्तरीय समितीची सध्या काम काम करत असून, आत्तापर्यंत काय निर्णय घेण्यात आला आहे या बद्दलचा खुलासा राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात आज (बुधवारी) करण्यात येणार आहे.

वकिलांनी दाखल केली होती याचिका

या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात वकिलांना न्यायालयीन सुनावणीसाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते .आतापर्यंतच्या अनलॉकच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या असून लोकल रेल्वे सामान्य जनतेसाठी खुली करण्यामध्ये काय अडचण आहे? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून आठ दिवसात याविषयी निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी १३ जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details