महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची अधिसूचना लवकरात लवकर काढण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांना स्मरणपत्र पाठविले आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Jan 6, 2021, 7:17 PM IST

Updated : Jan 6, 2021, 8:31 PM IST

मुंबई- औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिपसिंह पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे.

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांना स्मरणपत्र

या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यात केली आहे.


मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहराला संभाजीनगर हे नाव देण्याचा विषय गाजत असतानाच मुख्यमंत्र्यांनी येथील विमानतळाला संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी करणारे हे पत्र केंद्राला पाठवून यात त्यांनी भाजपची कोंडी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रामुळे केंद्र सरकारला यासाठीची अधिसूचना काढावी लागणार आहे, अन्यथा महाविकास आघाडीच्या नेत्यांना यासाठी भाजपवर टीका करण्याची नामी संधी मिळणार आहे.

नामकरणाबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करून सांगण्यात आले आहे.

Last Updated : Jan 6, 2021, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details