महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ऑनड्युटी मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरी - Maharashtra government new decision for Compassionate Appointment

'अ' आणि 'ब' गटातील अधिकाऱ्यांचे ऑनड्युटी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला गट 'क' किंवा 'ड' मध्ये अनुकंपा तत्त्वावर समावून घेतले जाणार आहे. आज (गुरूवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

Government Compassionate Appointment new Decision
ऑनड्युटी मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरी

By

Published : Aug 26, 2021, 7:43 PM IST

मुंबई - शासकीय सेवेतील गट 'अ' किंवा 'ब' गटातील कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज (गुरूवार) घेतला आहे. गट 'अ' आणि 'ब' गटातील अधिकाऱ्यांनाही अनुकंपा धोरण हे लागू होणार आहे. मात्र, त्यांच्या वारसांना गट 'क' किंवा 'ड' मध्ये अनुकंपा तत्त्वावर समावून घेतले जाणार आहे. या निर्णयामुळे सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अशी मिळणार अनुकंपा तत्वातर नियुक्ती -

कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांनी अनुकंपा धोरण हे 'अ' आणि 'ब' गटासाठीही अनुकंपा हा नियम लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज (गुरूवार) यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला होता. दरम्यान, गट 'अ' किंवा गट 'ब' मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट 'क' किंवा गट 'ड' मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठी नवीन आदेश -

याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी अनुकंपा तत्वावर फक्त 'क' आणि 'ड' या गटातीलच कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिल्या जात होती. मात्र, आता या निर्णयाने 'अ' आणि 'ब' गटातील आधिकाऱ्यांनाही अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाणार आहे.

हेही वाचा -जुने व्हायरस पुन्हा आलेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल - उद्धव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details