महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Western Railway : '२५ डिसेंबर' रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर डुंगरी आणि बिलीमोरा पूल बांधकामामुळे पावर ब्लॉक - जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर

Western Railway: पश्चिम रेल्वे वरील या बदललेल्या परिस्थिती संदर्भात जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी माहिती दिली की, काही महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक केला जात आहे. (Western Railway) डोंगरी या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू केले जात आहे. (Dungri Bilimora bridge) त्यामुळे दादर आणि वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या काही एक्सप्रेस ट्रेन यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.

बिलीमोरा पूल बांधकामामुळे पावर ब्लॉक
Western Railway

By

Published : Dec 24, 2022, 6:05 PM IST

मुंबई :डुंगरी आणि बिलीमोरा स्थानकांदरम्यान पुलाच्या मजबुतीकरणाचे काम करण्यासाठी अप आणि डाऊन मार्गांवर रविवार, 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 09.35 ते 14.35 (December 25 power block) वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांचे नियमन केले जाईल. (Dungri Bilimora bridge) यामुळे दादर आणि वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या काही गाड्या प्रभावित होतील.

25 डिसेंबर 2022 रोजी नियमन करण्यात येणार्‍या गाड्या

1. ट्रेन क्रमांक 19015 दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस 01 तास 20 मिनिटांसाठी नियमित केली जाईल.

2. ट्रेन क्रमांक 12471 वांद्रे टर्मिनस - श्री माता वैष्णो देवी कटरा स्वराज एक्सप्रेस 01 तास 15 मिनिटांसाठी नियमित केली जाईल.

3. ट्रेन क्रमांक 12925 वांद्रे टर्मिनस - अमृतसर पश्चिम एक्सप्रेस 30 मिनिटांसाठी नियमित केली जाईल.

4. ट्रेन क्रमांक 12216 वांद्रे टर्मिनस - दिल्ली सराय रोहिला गरीब रथ एक्सप्रेस 25 मिनिटांसाठी नियमित केली जाईल.

5. ट्रेन क्रमांक 12217 कोचुवेली-चंदीगड एक्सप्रेस 20 मिनिटांसाठी नियमित केली जाईल.

महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक:पश्चिम रेल्वे वरील या बदललेल्या परिस्थिती संदर्भात जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी माहिती दिली की, काही महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक केला जात आहे. डोंगरी या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू केले जात आहे. त्यामुळे दादर आणि वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या काही एक्सप्रेस ट्रेन यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.

ABOUT THE AUTHOR

...view details