मुंबई- पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ५० वर्षीय महिलेवर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज (२० जुलै) त्यांचा मृत्यू झाला.
मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३१ वर; उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू - पश्चिम उपनगर
मालाड येथे भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या घटनेत आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला होता. तर आता मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ५० वर्षीय महिलेचा आज (शनिवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३१ व
पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही संरक्षक भिंत २ जुलैला रात्री पावसात कोसळली. या दुर्घटनेत मोठ्या संख्येने तेथील रहिवाशी जखमी झाले होते. आतापर्यंत या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला. तर आज या दुर्घटनेतील जखमी ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे.