मुंबई:मुंबईत ४६ लाख ३ हजार ३८८ घरांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३६९५ संशयित रुग्ण सापडले (Record of suspected patients) आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे २५२ रुग्ण दिसून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा, गोवंडी शिवाजी नगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल, कुर्ला भाभा , क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली आदी रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ९७ बेडवर रुग्ण असून २३३ बेड रिक्त आहेत. १४१ जनरल बेडपैकी ७१, १५४ ऑक्सीजन बेड पैकी २१, ३५ आयसीयु बेड पैकी ५ तर २० व्हेंटिलेट पैकी २ व्हेंटिलेटरवर (2 patients on ventilator) रुग्ण आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १९ हजार ९८० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत १० तर बाहेरील ३ मृत्यू :मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १० मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. २ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.