मुंबई - तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आंदोलन सुरू आहेत. मात्र, यासंदर्भात आपले पैसे परत मिळावे म्हणून सोमवारी मुंबईतील दिवानी न्यायालयाबाहेर पीएमसी बँक खातेदारांनी आंदोलन केले. मात्र, त्यानंतर संजय गुलाटी या पीएमसी बँक खातेदाराचा मृत्यू झाला आहे.
पीएमसी बँके प्रकरणी तणावाखाली असलेल्या बँक खातेदाराचा मृत्यू - संजय गुलाटी मुंबई बातमी
काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज मधील नोकरी गमावल्यानंतर मिळालेला पैसा संजय गुलाटी यांनी पीएमसी बँकेमध्ये ठेवी स्वरुपात ठेवला होता. मात्र, बँकच बुडाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते.
हेही वाचा-तपास अधिकारी बदला; कॉ. पानसरेंच्या कुटुंबीयांची न्यायालयात मागणी
काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज मधील नोकरी गमावल्यानंतर मिळालेला पैसा संजय गुलाटी यांनी पीएमसी बँकेमध्ये ठेवी स्वरुपात ठेवला होता. मात्र, बँकच बुडाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. सोमवारी दिवाणी न्यायालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर संजय गुलाटी हे त्यांच्या घरी आले होते. काही वेळातच संजय यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.