मुंबई : सैफी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू (Death by fake injection) झाल्याचे एफडीएच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून व्ही पी रोड पोलिसांनी मुंबईतील सैफी रुग्णालयातील मेडिकल सह ठाणे पुणे औरंगाबाद तसेच दिल्लीतील अकरा फार्मा सेंटर पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (FIR in v p road police station mumbai )
ओरोफर इंजेक्शन :या प्रकरणी बीपी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे त्यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. सैफी रुग्णालयात रक्तातील तांबड्या पेशींची कमी झाल्याने विवेक कांबळे यांच्यावरती उपचार सुरू होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना ओरोफर हे इंजेक्शन दिले. मात्र, इंजेक्शनचा दुष्परिणाम होऊन रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवायकांनी एफडीएकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत एफडीएने तातडीने रुग्णालयावर कारवाई केली. ही कारवाई 10 ते 11 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आली. या कारवाईमध्ये एफडीएने रुग्णालयातील ओरोफर इंजेक्शनच्या साठ्याची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या इंजेक्शनचा साठा जप्त केला. त्याचप्रमाणे जप्त केलेले इंजेक्शनचे काही नमुने एफडीएने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले होते. ( Death of patient in saifee hospital )