मुंबई- कोरोना विषाणूमुळे मुंबई पोलीस खात्यातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 45 वर्षीय पोलीस शिपायाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
धक्कादायक..! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू - Mumbai Corona news
मुंबई पोलीस खात्यातील 6, नाशिक, पुणे आणि सोलापूर येथील प्रत्येकी 1 पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
मुंबई पोलीस खात्यातील 6, नाशिक, पुणे आणि सोलापूर येथील प्रत्येकी 1 पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी लॉकडाऊनची रस्त्यावर 24 तास उभे राहून अंमलबजावणी करणाऱ्या राज्यातील तब्बल 1001 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
यामध्ये तब्बल 107 पोलीस अधिकारी असून 894 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 142 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 18 पोलीस अधिकारी व 124 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 851 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 89 पोलीस अधिकारी व 851 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.