मुंबई - शास्त्रीय व लोककला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 वीच्या परीक्षेत सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 24 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार हा बदल करण्यात आला.
शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना नोंदणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ - शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था
गेल्या आठ दिवसांपासून राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना नोंदणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी शास्त्रीय व लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर अर्ज संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाकडे सादर करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2019 आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदरचे अर्ज सादर करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.