मुंबई- राज्याच्या गृह विभागाकडून चौदा आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांची संपत्ती जाहीर करण्याच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. यामध्ये चक्क २६/११ मध्ये शहीद झालेले अशोक कामटे व तत्कालीन दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हिमांशू रॉय यांचे नावसुद्धा असल्याचे समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर स्वतः पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी ही यादी चुकीची असून नजर चुकीमुळे हे घडले असल्याचे सांगत सदरचे आदेश मागे घेतलेले आहेत.
अजब कारनामा ! मृत पोलीस अधिकाऱ्यांसह निवृत्त अधिकाऱ्यांना धाडल्या संपत्ती जाहीर करण्याच्या नोटीस - Director General of Police Subhash Jaiswal
गृह विभागाकडून पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये २६/११ मध्ये शहीद झालेले अशोक कामटे, हिमांशू रॉय, आर. के सहाय, आनंद माड्या या मृत आयपीएस अधिकाऱ्यांनासुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे.
गृह विभागाकडून पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये २६/११ मध्ये शहीद झालेले अशोक कामटे, हिमांशू रॉय, आर.के सहाय, आनंद माड्या या मृत आयपीएस अधिकाऱ्यांनासुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे. तर, दुसरीकडे भगवंतराव मोरे, मारिया फर्नांडिस, विजय कृष्ण यादव या आयपीएस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहेत. पण, मुळात हे सर्व आयपीएस अधिकारी सध्या निवृत्त झालेले आहेत. वि. वि लक्ष्मीनारायण, पी.एन रासकर, दलबिर सिंह भारती, अजय कुमार बंसल, पी.एन मगर, अंकित गोयल, हिरानी मोहन कुमार या सध्या कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांचासुद्धा यादीमध्ये समावेश आहे. यावर ही यादी चुकीच्या पद्धतीने बनवलेली असून याद्वारे मृत आयपीएस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा कुठलाही हेतू नसल्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, याप्रकरणी दिलेले आदेश मागे घेतले असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.
हेही वाचा-ठाकरे सरकारचा फडणवीसांना पुन्हा दणका, 'या' नियुक्त्या केल्या रद्द