मुंबई - पवईतील फुले नगर वसाहतीच्या डोंगराळ भागातील शंकर मंदिराच्या परिसरात बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास स्थानिकांना एक हरीण मृत अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी याची माहिती वनविभाग व स्थानिक पोलिसांना तात्काळ दिली. वनविभाग मृत हरिण घटनास्थळावरून ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करिता घेऊन गेले. हरीणाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.
पवईत मंदिराच्या परिसरात हरीण मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ - पवई
पवईतील फुले नगर वसाहतीच्या डोंगराळ भागातील शंकर मंदिराच्या परिसरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास स्थानिकांना एक हरीण मृत अवस्थेत आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पवईत मंदिराच्या परिसरात हरीण मृत अवस्थेत आढळले खळबळ उडाली
पवईतील फुले नगर वसाहत आरेच्या डोंगराळ भागाच्या जवळ असून याठिकाणी अनेकदा वन्य प्राणी पाणी व अन्न शोधण्यासाठी येतात. या वसाहतीच्या जवळच डोंगरावर एक शंकर मंदिर आहे. दिवसभर येथे भाविक व रहिवाश्याची वर्दळ असते. मात्र,सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग मुंबईत वाढत असल्याने लॉकडॉऊन घोषित असून या ठिकाणची वर्दळ कमी झाली आहे. कोरोनाने मानव घरात असून वन्य जीव मोकळा श्वास घेत मानवी वस्तीत येत आहेत.
Last Updated : Apr 22, 2020, 3:17 PM IST