मुंबई : मुंंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील जुहू परिसरात मंगळवारी (7 फेब्रुवारी) एका बागेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतला. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात आपण मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण : जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर रोड 5 आणि 6 जवळील 151 येथील मोकळ्या जागेवरील झाडावर हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. जुहू पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतला. नंतर विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल केला आहे. रुग्णालयात मृतदेहाची वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन केले आहे. आरीफ इसाक इरुस हाझी (४२ वर्षे)असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे.