मुंबई - गांधीनगर जंक्शनजवळ एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. मुंबईतील पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गांधीनगर जंक्शनजवळील डॉकयार्ड कॉलनीत झुडपातून दुर्गंधी येत येत होती. त्यामुळे काही युवकांनी झुडपात उतरून पाहणी केली असता एक युवक निपचित पडलेला आढळून आला. तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली.