मुंबई - येथील सायन चुनाभट्टी मार्गावर असलेल्या तलावात महिलेचा मृतदेह सापडला आहे. आज (सोमवार) सकाळच्या सुमारास हा प्रकार समोर आला. रुक्मिणी विठ्ठल पाचरणे (वय - 70 रा. धारावी) असे मृत महिलेचे नाव आहे.
सायन तलावात तरंगताना सापडले वयोवृद्ध महिलेचे शव - death body found sayan lake news
सायन तलावातील परिसरात एका महिलेचा शव तरंगत असल्याचे येथे फेरफटका मारण्याकरिता आलेल्या नागरिकांना लक्षात आले. यानंतर त्यांनी याबाबत सायन पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा -'एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत'
सायन तलावातील परिसरात एका महिलेचा शव तरंगत असल्याचे येथे फेरफटका मारण्याकरिता आलेल्या नागरिकांना लक्षात आले. यानंतर त्यांनी याबाबत सायन पोलीस ठाण्याला माहिती दिली. तर पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी काही स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. यानंतर हा मृतदेह पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात तपासणी करता पाठवण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी सदर महिलेस मृत घोषित केले. याप्रकरणी सायन पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.