मुंबई - परराज्यातील किंवा लॉकडाऊनमुळे इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पोलीस उपायुक्तांकडून (डीसीपी) नागरिकांना स्थलांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. डीसीपी आंतरराज्यीय किंवा आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी देऊ शकतात.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी DCP ची परवानगी आवश्यक, सरकारचा निर्णय - जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी डीसीपींकडून घ्यावी लागणार परवानगी
आता पोलीस उपायुक्तांकडून( डीसीपी) नागरिकांना स्थलांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. डीसीपी आंतरराज्यीय किंवा आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी देऊ शकतात. तर, पुणे आणि मुंबई या शहरांना यातून वगळण्यात आले आहे. या शहरांमध्ये प्रवासास बंदी आहे.
जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी डीसीपींकडून घ्यावी लागणार परवानगी
तर, पुणे आणि मुंबई या शहरांना यातून वगळण्यात आले आहे. या शहरांमध्ये प्रवासास बंदी असणार आहे. ही सुविधा विशेषतः कामगारांसाठी असणार आहे. प्रवासाच्या परवानगीसाठी नागरिक आपल्या जवळील पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करु शकतात. यासाठी तुमची माहिती आणि मेडिकल सर्टीफिकेट असणे गरजेचे आहे. संबंधित अर्ज डीसीपी यांच्याकडे पाठवले जातील. यानंतर कोरोनाचा प्रसार होणार नाही, याचा विचार करुन डीसीपी नागरिकांना प्रवासासाठी परवानगी देतील.