महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : बघूच आता शवासन कुणाला करावे लागते; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार - देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला आता देवेंद्र फढणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आम्ही कोणाच्या घरावर जात नाही. फडणवीस यांनी आपले घर सांभाळावे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 24, 2023, 3:33 PM IST

Updated : Jun 24, 2023, 3:38 PM IST

मुंबई -शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील शिवाजी मंदिरात झालेल्या शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात भाजप तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत त्याच पद्धतीचे सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे यांच्यातील सुरू असलेले शब्दिक युद्ध येणाऱ्या दिवसात वाढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

देवेंद्रजी तुम्हालाही परिवार आहे. तुमच्या परिवाराचे पण व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्याविषयी अजून बोललो नाही. त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. तुम्हाला कोणतीही आसन झेपणार नाही. फक्त झोपावे लागेल. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेईल. आम्ही कोणाच्या घरात जात नाहीत. जर घर आणि परिवारावर बोलून तर तुम्हाला फक्त योगासन करावे लागले - उद्धव ठाकरे

मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअप चॅट' बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी 'बालबुद्धी' असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये-उद्धव ठाकरे यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट' बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी 'बालबुद्धी' असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.

पुस्तक काढायला भ्रष्टाचाराचे अनेक विषय -पुढे देवेंद्र फडणवीस म्हणतात की, चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर खालील विषयांवर काढा..

सामान्य शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर....
मुंबईला कुणी लुटले यावर...
मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर...
मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर...
१०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर...

तुमचे 'नड्डे' केव्हा सैल होतील -देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आहेत की, तुमचे हिंदूत्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे 'नड्डे' केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या.... बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते.... अशा पद्धतीने ट्विटद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले असून यावर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackeray : आम्ही कोणाच्या घरावर जात नाही, फडणवीसांनी आपले घर सांभाळावे- उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा
  2. Sanjay Raut On PM Modi : मणिपूर जळते तरी पंतप्रधान दौऱ्यावर; अमित शाहांनी मणिपूरमध्ये लावावी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक - संजय राऊत
  3. Lavani Artist Begging : एकेकाळी आपल्या अदाकारी अन् सौंदर्यानं राज्य गाजवणारी लावणी कलावंत आता रस्त्यावर मागतेय भिक
Last Updated : Jun 24, 2023, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details