मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यात राज्य सरकार राज्य कारभार करायचे सोडून कामाख्या देवीकडे गेले. ज्याला स्वतःवर भरोसा नाही तो काय दुसऱ्यांना सहारा देणार, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीबाबत खोटे किती बोलावे याला काही तारतम्य आहे. खोटं बोल पण रेटून बोल असे फडणवीस यांचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मंचावरून फडणवीस यांचं ऑडिओ रेकॉर्ड विधान शेतकऱ्यांना ऐकवले.
DCM Devendra Fadnavis : काहींना निदान जनाची नाही तर मनाचीही नाही, उपमुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - काहींना निदान जनाची नाही तर मनाचीही नाही
बुलढाणा येथील शेतकऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पलटवार ( Devendra Fadnavis on Uddhav Thackeray ) केला आहे. काहींना निदान जनाची नाही तर मनाचीही नाही, असा हल्ला बोल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना म्हटलेले आहे.
देवेंद्र फडवणीसांचा पलटवार - उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काहींना निदान जनाची नाही तर मनाचीही नाही, अशा आशयाचे विधान ट्विटरवर केले. तसेच फडणवीस यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरे काय म्हणाले, 2022 मध्ये शेतकऱ्यांना मदत करताना काय म्हणतात ते देखील ट्विटरवर ( Devendra Fadnavis on Twitter ) उत्तरदाखल प्रस्तुत केले आहे. 2019 मधील उद्धव ठाकरे त्या ट्विट मध्ये म्हणताना दाखवलं की "शेतकऱ्यांना 25 ते 50 हजार मदत दिली पाहिजे ही मागणी मान्य आहे. तसेच 2022मधील देखील विधान त्यासोबत त्यांनी जोडलेले आहे. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात, एकरी 50 हजार रूपये मदत तात्काळ मिळालीच पाहिजे." हा व्हिडीओ ट्विट करत खाली फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचा केवळ पोकळ कळवळा होता, असे म्हणून त्यांच्यावर टीका केली आहे.
शेतकऱ्यांचे वीज बील माफ केले - तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ हे सरकार करणार आहे का ? असा सवाल आजच्या शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केला होता .त्याला उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिलमाफ केल्याचे 22 नोव्हेंबर 2022 महावितरण संचालक यांचे पत्र देखील ट्विटरवर जोडले. खाली नमूद केले आहे की 'जे बोलतो ते करतो '.