मुंबई :रायगड जिल्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून दुर्घटना घडली. तेथे 48 घरे आहेत. मोठा जास्त झाल्यामुळे ही घटना घडली आहे. 1 तास पायी चालत जावून घटनास्थळी पोहचावे लागत होते.ब चावकार्य सोपे नव्हते. पण एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तिकडे पोहोचल्या आहेत. आताही मदतकार्य सुरू आहे. जास्त पाऊस होत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. स्वतः मुख्यमंत्री पूर्ण बचवकार्याचा आढावा घेत आहेत.
दुर्घटनेत झाला अनेकजणांचा मृत्यु :आतापर्यंत 10 जणांचा मृत्य झाल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. त्यांना मातीच्या ढिगाऱ्याखालुन बाहेर काढल्यानंतर त्याची तपासणी केली जात आहे. कुटूंबियांशी त्यांची ओळख पटवली जात आहे. सव्वा दोनशे लोक वस्तीचे गाव आहे. तेथील परिस्थितीबाबत मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक आमदार यांच्याशी वारंवार संपर्कात आहे. आतापर्यंत 80 जणांची ओळख पटली आहे.
भूस्खलनाचे स्पॉट बदलत आहेत : भूस्खलनाचे स्पॉट बदलत आहे. गतवर्षी तपासणी करून माहिती घेतलेल्या भुस्कलनाच्या स्पॉटवर दरड कोसळत नाही, तर दुसरीकडे कोसळत आहे. ज्या ठिकाणी भूस्खलनाचे स्पॉट आहेत. त्या ठिकाणी योग्य उपाय योजना आहेत. सगळीकडे अलर्ट देण्यात आले आहेत. राज्यभरात आपल्याला अनेक घटना पाहायला मिळत आहेत. सर्वांना मदत केली जाईल, पैशाची कोणतीही अडचण नसल्याचे फडवणीस यांनी म्हटले आहे. या घटनेतील लोकांना योग्य मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.