महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar At Silver Oak : बंडखोरीनंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या घरी, जाणूून घ्या भेटीमागचे कारण - Pawar at Silver Oak

अजित पवारांच्या बंडानंतर ते पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर पोहोचल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Ajit Pawar At Silver Oak
Ajit Pawar At Silver Oak

By

Published : Jul 14, 2023, 11:00 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया : प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी घरात पडल्याने प्रतिभा पवार यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे प्रतिभा पवार यांच्या हातावर छोटी शस्त्रक्रिया आज करण्यात आली आहे. डॉ. मुल्लाजी यांनी प्रतिभाताईंच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून त्यांना रात्री 8.30 वाजता घरी सोडण्यात आले आहे. शस्त्रक्रियेवेळी शरद पवार, सुप्रिया सुळे देखील ब्रीच कँडी रुग्णालयात उपस्थित होते.

कौटुंबिक कारणामुळे अजित पवार सिल्व्हर ओकवर : राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शरद पवारांशी संबंध तोडून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपसोबत सरकारमध्ये आहेत. यानंतर तो प्रथमच सिल्व्हर ओकवर जाणार असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या. मात्र, अजित पवारांचे सिल्व्हर ओकवर जाण्याचे कारण कौटुंबिक असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवार तसेच प्रतिभा पवार यांची ही भेट कौटुंबिक बाब होती. आई प्रतिभा पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुप्रिया सुळेही दोन-तीन दिवसापासून सक्रिय नाहीत. सुप्रिया सुळे यांनी गेल्या आठवड्यापासून कोणतेही राजकीय ट्विट केलेले दिसत नाही. आज अजित पवार सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहचल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, मात्र ही भेट कौटुंबिक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

भेटी मागचे कारण गुलदस्त्यात - पवार कुटुंबांचा एकोपा संपूर्ण राज्याला माहीत आहे. राजकारणात जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी पवार कुटुंबीय सुखदुःखात एकत्र आल्याचे चित्र अनेकवेळा पाहायला मिळत असते. अजित पवारांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाळी करत सेना भाजपासोबत हात मिळवणी केली तरीही कौटुंबिक संबंध आणि आपल्या काकुची विचारपूस करण्यासाठी ते थेट सिल्वर ओक निवासस्थानी गेले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे निवासस्थानी होते का नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही. तसेच ही भेट नेमकी कशासाठी होती याविषयी देखील तर्कवितर्क लावले जात आहे.

हेही वाचा -Pratibha Pawar Admitted : शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांवर होणार शस्त्रक्रिया; 'ब्रीच कँडी'मध्ये भरती

ABOUT THE AUTHOR

...view details