महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Stalins Sharp Attack on MMRCL Director : 66 हेक्‍टर बंजर जमिनीवर हिरवे रान करा; दयानंद स्टॅलिन यांचा एमएमआरसीएल संचालकांना खोचक टोला - Suggest Green up 66 Hectares of Barren Land

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने मेट्रो-३ च्या स्थानकांच्या कामाकरिता प्रभावित झालेल्या झाडांचे त्यांच्या मूळ जागी वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला सिप्झ स्थानकापासून आज व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्या हस्ते सुरुवात झाली. मेट्रो स्थानकांतील इलेक्ट्रॉनिक्स प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा (ERTL) परिसरात या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

Dayanand Stalin Sharp Taunt on MMRCL Director And Suggest Green up 66 Hectares of Barren Land
66 हेक्‍टर बंजर जमिनीवर हिरवे रान करा; दयानंद स्टॅलिन यांचा एमएमआरसीएल संचालकांना खोचक टोला

By

Published : Jan 25, 2023, 10:24 PM IST

मुंबई : मुंबई मेट्रो लाईन 3 कामासाठी हजारो झाडे तोडावी लागली आहेत, असे एमएमआरसिएलच म्हणणे होते. त्याला जनतेने प्रश्नदेखील केला होता. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिकादेखील दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना मुंबई जिल्हा वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज दाखल करा, असे निर्देश दिले. मात्र, वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे तो निर्णय प्रशासनाकडे गेला आहे. तो निर्णय येणे बाकी आहे.

66 हेक्‍टर बंजर जमिनीवर हिरवे रान करा

मुंबई जिल्हा वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज :मेट्रोकरिता प्रचंड वृक्षतोड केली गेल्याने सर्वोच्च न्यायालयात पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत संस्था संघटनानी याचिकादेखील केली आहे. त्याचादेखील अंतिम निकाल यायचा आहे. परंतु, जनतेने शासनाला आणि मेट्रो प्राधिकरणाला सतत सवाल केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेलवे महामंडळाचा हा उपक्रम पाहावा लागेल.

मेट्रो स्थानकाच्या बांधकामात ३००० झाडे प्रभावित :मेट्रो-३ मधील २६ स्थानकांच्या बांधकामादरम्यान साधारण ३००० झाडे प्रभावित झाली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे मुं.मे.रे.कॉ. हे राज्यातील विविध बागांमध्ये १८ इंच परिघ असलेली तितकीच झाडे रुजवत असून मेट्रो स्थानकांच्या त्याच परिसरात मूळ जागी (In-situ) त्याला पुनर्स्थापित करीत आहेत. आजच्या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात वृक्षारोपणातील पॅकेज १९ पासून करण्यात आली असून याअंतर्गत सिप्झ ते धारावीपर्यंतच्या १० स्थानकांचा समावेश होतो. पॅकेज १९ अंतर्गत देशी बदाम, ताम्हण (फुल) आणि पांगारा (फुल) प्रजातींसह १७ स्थानिक प्रजातींची एकूण १०८५ झाडे लावली जातील.'

मूळ जागी करणार वृक्षारोपण : मूळ जागी वृक्षरोपण (In-situ plantation) मोहिमेला सुरुवात करून आपण पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत असल्याचा मला आनंद होत आहे. या मोहिमेंतर्गत पुढील ३ वर्षांमध्ये बागेत रुजवलेली जवळपास ३००० हजार झाडे मेट्रो स्थानकांच्या परिसरात लावून त्यांची तीन वर्षे देखरेख कॉर्पोरेशनद्वारे केली जाणार आहेत, असे श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले.

दयानंद स्टॅलिन यांची खोचक टीका :यासंदर्भात सातत्याने मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ द्वारा प्रकल्पासाठी जी झाड तोडली गेली आहेत आणि जंगल नष्ट केले गेले आहे त्याबाबत सातत्याने लढा देणारे वनशक्ती संस्थेचे दयानंद तालीम यांनी म्हटले की, "मेट्रोकरिता यांनी 66 एकर हेक्टर जमीन त्यावरील जंगल नष्ट केलेले आहे. यांनी आधी बंजर असलेल्या जमिनीवर रान करून दाखवा, येथे वनराई उगवून दाखवा मग हे असले कार्यक्रम करा' हा भंपकपणा तत्काळ थांबवा. जंगल नष्ट करायचे आणि तिथे घर बांधून जंगलाचा आभास निर्माण करायचा."अशी खोचक टीका त्यांनी अश्विनी भिडे यांचे नाव न घेता केली.

ABOUT THE AUTHOR

...view details