मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासामध्ये अशी माहिती समोर आली आहे की, दाऊदची दुसरी पत्नी ही पाकिस्तानी पठाण समुदायामधील आहे. एनआयला दुसऱ्या लग्नासंदर्भात दाऊदच्या नातेवाईकानेच माहिती दिली. मात्र, या व्यक्तीने दाऊदची ही दुसरी पत्नी कुठे राहते आणि नेमके लग्न कधी झाले याबद्दलची माहिती दिली नाही. दाऊद सध्या 67 वर्षांचा आहे.
दुसऱ्या विवाहबाबत माहिती : दुसऱ्या विवाहासाठी दाऊदने पहिली पत्नी मेहजबिन हिला घटस्फोट दिल्याचे सांगितले होते. पण ती जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा होती. उलट महेजबिन दाऊदच्यावतीने भारतातील नातेवाईकांच्या संपर्कात असल्याची माहिती दाऊदच्या भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा आलिशाह पारकर याने एनआयएच्या चौकशीत दिली. आलीशहा पारकर हा मुंबई सेंट्रल येथील दूधवाला अपार्टमेंट येथे सध्या वास्तव्यास आहे.
दाऊदची पहिली पत्नी दुबईत भेटली :अलीशाहने सांगितले की, तो दाऊदची पहिली पत्नी मेहजबिन हिला जुलै 2022 मध्ये दुबईत भेटला होता. महजबिननेच दाऊद इब्राहिमच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अलीशाह याला सांगितले होते. अलीशाहच्या म्हणण्यानुसार, दाऊद इब्राहिमची पहिली पत्नी महजबिन ही एकमेव आहे जी प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी व्हॉट्सअप कॉलद्वारे भारतील दाऊदच्या नातेवाईकांशी संपर्कात असते.