महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dawood D company : दाऊदचे डी कंपनी चालवण्यासाठी नवे जाळे, व्हॉइस मेसेजद्वारे कोड वर्डचा वापर - Dawood ibrahim kaskars

दाऊदने डी कंपनी चालवण्यासाठी स्वतःचे नेटवर्क तयार केले आहे. हे नेटवर्क चालवण्यासाठी सांकेतिक भाषा म्हणजेच कोड वर्ड जी सहजासहजी उलगडता येणार नाही, याचा वापर करून तो व्हॉइस मॅसेज पाठवत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मिळाली आहे.

Dawood ibrahim kaskars
दाऊद इब्राहिम

By

Published : Jan 18, 2023, 10:35 PM IST

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा करताना तपास यंत्रणेने (एनआयए) नुकतेच मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकून अनेकांना अटक केली होती. यामध्ये एनआयएच्या हाती दाऊद इब्राहिमच्या गॅंगबद्दल महत्वाची माहिती लागली आहे. दाऊदची डी कंपनी त्याचे नेटवर्क चालवण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करत आहे. या भाषेद्वारे ते व्हॉईस मॅसेज पाठवत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिली आहे.

दाऊद छोटा शकीलला देतो सूचना : आता दाऊदचा राईड हँड असलेल्या छोटा शकीलला मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली खंडणी पाकिस्तानात पाठवल्याची माहिती समोर आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. दाऊद त्याचा निरोप अथवा सूचना छोटा शकीलला देतो. छोटा शकील त्याचे रूपांतर पुन्हा कोड वर्ड भाषेतील व्हॉइस मॅसेजमध्ये करतो. त्यालाही विशिष्ट पासवर्ड असतो. छोटा शकीलकडून तो मेसेज दुबईत जैदला पाठवला जातो. जैद दुसऱ्या नंबरवरून तो शब्बीरला पाठवल्यानंतर शब्बीर तो मॅसेज आरिफ भाईजानला पाठवतो.


कोड वर्ड भाषेत व्हॉइस मॅसेजचा वापर : हवालामार्फत केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठीही याच पद्धतीने कोड वर्ड भाषेत व्हॉइस मॅसेजचा वापर केला जातो. त्याचे मॅसेज पाठवण्याचा आणि निरोप मिळवण्याचा क्रमही याच पद्धतीने असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे. यात वेगवेगळे नेटवर्क, मोबाईल नंबर वापरले जात असल्याने त्याचा माग काढणे कठीण ठरत आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या नाकी दम आला असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या पद्धतीने डी कंपनीचे जाळे पसरवण्याचे काम, निरोप पाठविण्याचे काम होते. याच पद्धतीचा वापर करून सध्या दाऊदचा कारभार सुरू असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे.

या प्रकारे पाठवला जातो मॅसेज : आरिफ भाईजान त्याचा कोड वर्ड भाषेतील आणि सांकेतिक भाषेचा वापर केलेला व्हॉइस मॅसेज (एन्क्रिप्टेड व्हॉइस मॅसेज ) रेकॉर्ड करतो. तो उघडण्यासाठीही पासवर्ड लागतो. हा मेसेज तो शब्बीर शेखला पाठवतो. शब्बीर शेख तो दुबईतील मध्यस्थ किंवा दाऊदचे व्यवहार सांभाळणाऱ्या जैदला पाठवतो. जैद आपल्या दुबईतील नंबरचा वापर करून तो मॅसेज कराचीत छोटा शकीलला पाठवतो. तो मेसेज छोटा शकील दाऊदला सांगतो, अशी सध्या दाऊदला कोड वर्डमार्फत संपर्क साधण्याची पद्धत आहे.


असे चालते दाऊदचे नेटवर्क : दाऊद सध्या कोणाच्याही थेट संपर्कात नसला तरी आपली डी गँग चालवण्यासाठी अनके बारीक बारीक फळ्यांतून जाणारे स्वतंत्र नेटवर्क त्याने उभारले आहे. त्यातून त्याच्या कंपनीतील लोकांना त्याचा मॅसेज बरोबर पोहोचवला जातो, अशी माहिती सध्या NIAच्या अटकेत असलेल्या छोटा शकीलचा मेव्हणा आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांच्या चौकशीतून उघड झाली.

हेही वाचा :Dawood Ibrahim second marriage : दाऊद पुन्हा अडकला लग्नाच्‍या बेडीत, पाकिस्तानातील पठाण युवतीशी केला दुसरा विवाह

ABOUT THE AUTHOR

...view details