मुंबई- मी सुरक्षित आहे. मी शरद पवार साहेब यांची साथ सोडणार नाही, असे आमदार दौलत दरोडा यांनी स्पष्ट केले. सोमवारी दरोडा हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर त्यांना गुजरातला नेले गेले. मात्र, आज सकाळी ते मुंबईत परतले असून राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मी पक्षाशी एकनिष्ठ आणि शरद पवारांसोबतच, आमदार दौलत दरोडा मुंबईत परतले - ncp meeting
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निशाणीवर निवडून आलो आहे. त्यामुळे, मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दरोडा यांनी केले.
आमदार दौलत दरोडा मुंबईत परतले
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निशाणीवर निवडून आलो आहे. त्यामुळे, मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दरोडा यांनी केले.