मुंबई -गेल्या काही दिवसात देशभरात महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाणात वाढ झाली आहे. घराबाहेर मुली सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मुली घरात देखील सुरक्षित नसल्याची घटना घडली आहे. यात वडिलांनीच 6 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याने नराधम बापास आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे.
जन्मदात्याकडूनच 6 सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक हेही वाचा - बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट; जिजामाता बँकेनंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेला ८० लाखांचा गंडा
आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ज्यात जन्मदात्या वडीलानेच आपल्या 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नराधम बापाला आरसीएफ पालिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. आरोपी आपल्या पत्नी, मुलगा आणि 6 वर्षाच्या मुलीसोबत आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. आपल्याच मुलीसोबत गैरकृत्य करीत असे, एकदा हा सर्व प्रकार जेव्हा मुलीच्या आईने स्वतः पाहिला तेव्हा तिने आरसीएफ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. यावर आरोपी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोपान निघोट यांनी केली.
हेही वाचा - धुळ्यात कापूस व्यापाऱ्याचे २ लाख ६६ हजार रुपये घेऊन चोरटे पसार