मुंबईDatta Dalvi arrest -एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादात पुन्हा ठिणगी पडली आहे. मुंबईचे माजी महापौर व ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे.
संजय राऊत पोहोचले विक्रोळीत-ठाकरे गटाचे नेता दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच दत्ता दळवी यांच्या अटकेचा निषेध केला. विक्रोळी परिसरातील वातावरण तापले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत हे विक्रोळी परिसरात पोहोचले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे.
सरकार नालायक आहे, तुमच्या मंत्र्यांवर गुन्हे का दाखल करत नाही. दळवींनी वापरलेला शब्द 'धर्मवीर'मध्ये देखील आहे. तो शब्द चुकीचा असेल तर चित्रपट निर्मात्यावर गुन्हा दाखल करायला हवा. 'नालायक' हा शब्द असंसदीय नाही. गद्दारसम्राट आता 'हिंदूह्रदयसम्राट' म्हणवून घेत आहेत. सत्तारांनी सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केली. तेव्हा का गुन्हा दाखल करण्यात आला नाही? - ठाकरे गटाचे नेते तथा खासदार -संजय राऊत