मुंबई :राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला (Maharashtra Karnataka border issues ) असून यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने उच्च अधिकार समिती नेमली. या समितीमधील मंत्री कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर उद्या जाणार होते. कर्नाटकातून राज्यातील मंत्र्यांनी येऊ नये, असा इशारा देण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील ( Minister Chandrakant Patil ) आणि शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी हा दौरा रद्द केला.
सोलापूरात कर्नाटक भवन करायचा घोषित : विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरूनही हल्लाबोल केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री जत तालुक्यामध्ये उघडपणे शेतकऱ्यांना पाणी सोडतात, सोलापूरात कर्नाटक भवन करायचा घोषित करतात.