मुंबई -दलित पँथरच्या राष्ट्रीय अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासोबत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. दलित पँथरचे राज्यभरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत्या निवडणुकीत शिवसेनेला मदत करणार असल्याचे आश्वासन ढसाळ यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
दलित पँथरचा शिवसेनेला पाठिंबा, मल्लिका ढसाळ यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - शिवसेना
दिवंगत साहित्यिक, दलित नेते पद्मश्री नामदेव ढसाळ आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही ढसाळ यांची मैत्री जमली. मात्र, नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर पँथरची घडी विस्कटली होती. आता मल्लिका नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली पँथर पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
दिवंगत साहित्यिक, दलित नेते पद्मश्री नामदेव ढसाळ आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही ढसाळ यांची मैत्री जमली. मात्र, नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर पँथरची घडी विस्कटली होती. आता मल्लिका नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली पँथर पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. येत्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका पँथरकडून स्पष्ट करण्यात आली आहे. यावेळी पँथरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेव पडवळ, महाराष्ट्र सरचिटणीस अरविंद मोरे, केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम, मुंबई अध्यक्ष प्रताप रावल आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.