मुंबई- आंबेडकरी चळवळीतील नेते व दलित पँथरचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत व लेखक राजा ढाले यांचे मुंबईत मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजा ढाले ७८ वर्षाचे होते. ढाले यांचे पार्थिव विक्रोळी येथील त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
दलित चळवळीचा 'पँथर' हरपला; अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी - Minister of Social Justice Avinash Mahatekar
आज सकाळी १० वाजता राजा ढाले यांचे पार्थिव विक्रोळीच्या गोदरेज रुग्णालयात ठेवण्यात आले. काल दिवसभर त्यांच्या घरी पत्नी आणि मुलीचे सांत्वन करण्यासाठी त्यांचे अनुयायी व सहकारी भेट देत होते.
आज सकाळी १० वाजता ढाले यांचे पार्थिव विक्रोळीच्या गोदरेज रुग्णालयात ठेवण्यात आले. काल दिवसभर त्यांच्या घरी पत्नी आणि मुलीचे सांत्वन करण्यासाठी त्यांचे अनुयायी व सहकारी भेट देत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, भारिपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, तर आज सकाळी ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, सुरेश माने व रिपाई नेते गौतम सोनवणे यांनी राजा ढाले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दरम्यान, त्यांच्या विक्रोळी येथील घराबाहेर अनुयायांनी गर्दी केली आहे.