महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Mevani On Darshan Solanki Suicide Case: आयआयटी विद्यार्थी दर्शन सोळंकीच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा- आ. जिग्नेश मेवाणी

गुजरात काँग्रेसचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी गुरुवारी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) मुंबईतील आयआयटी विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली. दर्शनचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर मुंबई पोलिसांच्या पथकाने मृतक दर्शनच्या पालकांचे जबाब नोंदवण्यासाठी अहमदाबादमधील त्याच्या घरी पालकांना भेट दिली.

MLA Mevani On Darshan Solanki Suicide Case
जिग्नेश मेवाणी

By

Published : Feb 16, 2023, 11:04 PM IST

अहमदाबाद/मुंबई: दलित नेते मेवाणी म्हणाले की, आयआयटी बॉम्बे येथील बीटेकच्या (केमिकल) प्रथम वर्षाच्या विद्यार्थी दर्शन सोळंकी यांचा मृत्यू , आत्महत्या ही जातीय भेदभाव, रॅगिंगचे प्रकरण आहे. रविवारी (१२ फेब्रुवारी) आयआयटीच्या पवई कॅम्पसमधील एका वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून दर्शनने आत्महत्या केली. परंतु त्याच्या मृत्यूमागे त्याच्या कुटुंबीयांचा संशय आहे. दलित नेते मेवाणी यांनी अहमदाबाद स्थित मृतक दर्शनच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर, दिवंगत विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ दलित समाजाच्या वतीने १९ फेब्रुवारीला देशव्यापी कँडल मार्च काढण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे आमदार म्हणाले, दर्शनचे वडील रमेश सोळंकी यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मृत मुलाचा चेहराही पाहण्याची परवानगी दिली गेली नाही. जेव्हा की, ते मुलाचा मृतदेह घेण्यासाठी मुंबईला गेले होते.

अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता: इन्स्टिट्यूटने त्यांना फोनवर वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत आहे. त्यांनी दावा केला की, मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे विद्यार्थ्याच्या वडिलांना देण्यास पोलीस तयार नव्हते आणि आयआयटी बॉम्बेचे डीन आणि इतर अधिकारी पुरेसे संवेदनशील नव्हते. त्यांचा व्यवहार आणि ही घटना संशयास्पद असल्याने म्हणणे आहे, असे मेवाणी म्हणाले. दलित अधिकार कार्यकर्त्याने म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी.

भेदभावाच्या वागणुकीमुळे आत्महत्या? सोळंकी हा एक हुशार विद्यार्थी होता, ज्याने आरक्षण धोरणाची अयोग्य अंमलबजावणी होत असताना अशा वेळी प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला. दलित आणि आदिवासी समाजातील काही उमेदवारांनाच अशा महाविद्यालयांमध्ये जागा मिळते. बहुधा, दर्शन हा रोहित वेमुला (हैदराबादमध्ये) आणि पायल तडवी (मुंबईमध्ये) यांनी अनुभवलेल्या भेदभावाचा बळी होता. ज्यामुळे त्याने आत्महत्या केली होती, असे मेवाणी म्हणाले. हैदराबाद विद्यापीठाच्या रिसर्च स्कॉलर असलेल्या वेमुला याने 2016 मध्ये वसतिगृहाच्या खोलीत कथितरित्या गळफास लावून घेतला होता. 2019 मध्ये मुंबईतील टीएन टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजच्या स्त्रीरोगशास्त्राच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या पायल तडवी हीने तिच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दोघेही अनुसूचित जाती जमातीचे होते.

हत्येची दाट शक्यता: पवई पोलिसांच्या तीन सदस्यीय पथकाने ज्यांच्या अखत्यारीत आयआयटी बॉम्बे स्थित आहे. त्यांनी सकाळी सोलंकी यांच्या अहमदाबाद शहरातील मणिनगर येथील घरी भेट दिली. असे देशाच्या आर्थिक राजधानीत एका अधिकाऱ्याने सांगितले. सोलंकी यांच्या कुटुंबाने बुधवारी दावा केला की, त्याला आयआयटी बीमध्ये अनुसूचित जाती जमातीशी संबंधित असल्याने भेदभावाचा सामना करावा लागला आणि त्याची हत्या करण्यात आली असण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले. त्याच्या तपासाचा एक भाग म्हणून, टीम सोलंकी यांच्या आई, वडील आणि इतर नातेवाईकांशी बोलणार आहे. त्यात पुन्हा एकदा त्याच्या पालकांचे जबाब नोंदवले जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

आयआयटी प्रशासनाने आरोप फेटाळले:सोलंकीचे पालक मंगळवारी मुलाचा मृतदेह घेण्यासाठी मुंबईला आले होते. त्यांनी पोलीस चौकशीवर कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या कारणावर शंका व्यक्त केली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस पथक त्यांना या प्रकरणात आणखी काही सांगायचे आहे का किंवा त्यांच्याकडे काही आहे का असे त्यांनी विचारले. एका विद्यार्थी संघटनेने दर्शन सोलंकी याने जातीभेदातून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. आयआयटी बॉम्बे प्रशासनाने मात्र संस्थेतील जातीय भेदभावाचे आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा:Girish Bapat on Kasba Bypoll : नाकाला ऑक्सिजनची नळी; गिरीश बापट व्हिलचेअरवरून प्रचाराच्या मैदानात, विरोधक म्हणाले 'माणसापेक्षा भाजपाला...'

ABOUT THE AUTHOR

...view details