महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 8 हजारांहून अधिक; शनिवारी 51 रुग्णांचा मृत्यू - Maharashtra corona news

राज्यात शनिवारी 8 हजार 623 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळं राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 लाख 46 हजार 777 वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 टक्क्यांवर आहे.

corona
कोरोना

By

Published : Feb 27, 2021, 8:21 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनानं राज्यात पाय पसरायला सुरुवात केली. मात्र, 2020 वर्ष संपत असताना आणि नव्या वर्षाची सुरुवात होत असताना रुग्ण संख्येत घट दिसून आली. मात्र, पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचं चित्र दिसून येतं आहे.

24 फेब्रुवारीला राज्यात रुग्णसंख्या झपाट्यानं 8 हजाराच्या घरात गेली होती. ती मागील चार दिवस 8 हजाराच्या घरातच आहे. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात शनिवारी नव्या 8 हजार 623 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 24 तासात 51 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा -अमरावती-यवतमाळचे 262 पैकी 62 अहवाल निगेटिव्ह तर उर्वरित प्रतीक्षेत

राज्यात नव्या 8 हजार 623 जणांना कोरोनाची लागण

24 तासात राज्यात 8 हजार 623 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळं राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 लाख 46 हजार 777 वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 टक्क्यांवर आहे. तर, मृत्यू दर 2.43 टक्के आहे. राज्यात दिवसभरात 3 हजार 648 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 20 लाख 20 हजार 951 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 34 हजार 102 रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये असून 72 हजार 530 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा -मुंबईत कोरोनाचे 987 नवे रुग्ण, 4 मृत्यू

राज्यात या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई महापालिका क्षेत्र - 987
ठाणे महापालिका क्षेत्र- 202
नवीमुंबई महापालिका क्षेत्र - 116
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्र - 189
नाशिक मनपा क्षेत्र - 550
अहमदनगर - 178
पुणे मनपा क्षेत्र - 743
पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्र - 340
पुणे जिल्हा - 401
अमरावती मनपा क्षेत्र - 423
नागपूर - 838

ABOUT THE AUTHOR

...view details