मुंबई -वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हाताला काम आणि पोटाला भाकरी नसल्याने गावी गेलेले मुंबईतील परप्रांतीय मजूर आता पुन्हा मोठ्या संख्येने मुंबईत परतू लागले आहेत. मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर मुंबईत परतीच्या मार्गावर आहे. प्रत्येक दिवशी ५० हजारापेक्षा जास्त परप्रांतीय श्रमिक दररोज मुंबई दाखल होत आहे.
मुंबईकरांची डोके दुखी वाढणार -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईत काम करणाऱ्या परप्रांतीय मजूरांनी गेल्या वर्षीप्रमाणे हाल होऊ नये म्हणून होळीनंतर गावाकडची वाट पकडली होती. त्यात गेल्या महिन्यात झालेल्या पश्चिम बंगालचा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्ग गावाकडे गेला आहे. मात्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसारख्या अनेक राज्यात आता कोरोना रुग्णाची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे त्या-त्या राज्य सरकारने आता निर्बंध लावले आहेत. त्यामुळे तेथे उदर्निवाहाची साधने बंद असल्याने सोबतच मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर मुंबईत परतू लागले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रवाशांची कोरोना चाचणीविना मुंबईत दाखल होत असल्याने मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार आहे.
दररोज ५५ गाड्या दाखल -