मुंबई : तरुणाई म्हणजे उद्याचे असे भविष्य बोलले जाते. पण या तरुणाईने आपल्या उमेदीच्या काळात जिद्दीने पाय रोवून काहीतरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणे अपेक्षित आहे. मात्र, उलटपक्षी हि तरुण पिढी घरगुती भांडणे, तणाव, एकतर्फी प्रेम आणि नैराश्यातून आपले मौल्यवान आयुष्य संपवताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात दररोज १३ तरुण मुले-मुली आत्महत्या करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
आत्महत्येची कारणे : २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तरुण वर्गाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दिन महिन्याच्या काळात ऐकून १ हजार २३ आत्महत्या झाल्याच्या उघडकीस आले आहे. यापैकी निम्म्या आत्महत्या २० ते ४५ वयोगटातील आहेत. कौटुंबिक कलह, नोकरदार वर्गास तणाव असह्य होत असल्याचीही, महत्वाची बाब या आत्महत्यांना कारणीभूत ठरत आहे. त्याचप्रमाणे लग्न ठरत नसल्याने आलेले नैराश्य, आर्थिक तणाव, अभ्यासाचा तणाव, सासरी होणारा मानसिक छळ ही देखील या तरुण वर्गात होणाऱ्या आत्महत्यांची कारणे आहेत.
दीड महिन्यातील आत्महत्या : २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तरुण वर्गाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दिन महिन्याच्या काळात ऐकून १ हजार २३ आत्महत्या झाल्याच्या उघडकीस आले आहे. यापैकी निम्म्या आत्महत्या २० ते ४५ वयोगटातील आहेत. कौटुंबिक कलह, नोकरदार वर्गास तणाव असह्य होत असल्याचीही महत्वाची बाब या आत्महत्यांना कारणीभूत ठरत आहे. त्याचप्रमाणे लग्न ठरत नसल्याने आलेले नैराश्य, आर्थिक तणाव, अभ्यासाचा तणाव, सासरी होणारा मानसिक छळ ही देखील या तरुण वर्गात होणाऱ्या आत्महत्यांची कारणे आहेत.