मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगराला शहराशी लवकर जोडण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने दहिसर वर्सोवा सागरी किनारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे विविध सहा टप्प्यांमध्ये काम करण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला दहा हजार कोटी रुपये अंदाजे किंमत असलेल्या या प्रकल्पाची आता वाढीव किंमत 16000 कोटींच्या घरात गेली आहे.
वाढलेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या नव्या निविदा प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. सुमारे 22 किलोमीटर लांबीचा हा वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगाने होणार आहे. मुंबई महापालिकेचे प्रस्तावित मार्ग मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवाशांना वेगवान प्रवास करता यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे.
कल्याण भिवंडी यासह मुंबईला जोडणाऱ्या वसई विरार नवी मुंबई मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरा मध्येही मुंबई महापालिकेच्या वतीने विविध प्रकल्प सुरू आहेत. मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानच्या सागरी किनारा मार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून हे काम आतापर्यंत 75 टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हा मार्ग पुढे वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडला जाणार आहे.
महापालिकेने दहिसर ते भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामांसाठीही एल अँड टी या कंपनीला कंत्राट दिले आहे साधारण पाच किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम चार वर्षात पूर्ण होईल त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना मुंबईकरांना केवळ दहा मिनिटात येता येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दहिसर वर्सोवा हा सागरी किनारा मार्ग तब्बल 16000 कोटींचा असून 22 किलोमीटर लांबीचा आहे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन सहा हजार कोटी रुपयांचे वाढीव निविदा जाहीर केली आहे.
या प्रकल्पाचे काम सहा विविध टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात वर्सोवा ते बांगुर नगर दुसऱ्या टप्प्यात बांगुर नगर ते माईंड स्पेस मालाड आणि जी एम एल आर जो रस्त्याचे काम तिसऱ्या टप्प्यात माइंड स्पेस मालाड ते चारकोप या दरम्यान चे काम चौथ्या टप्प्यात मालाड या टप्प्यातील काम पाचव्या टप्प्यात चारकोप ते गोराई तर सहाव्या टप्प्यात गोराई ते दहिसर या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यासहित 48 महिन्यांच्या कालावधीत या मार्गांचे काम पूर्ण करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
टप्प्यानुसार कामाचा खर्च
- पहिला टप्पा वर्सोवा के बांगुर नगर साडेचार किलोमीटर 2593 कोटी
- दुसरा टप्पा बांबू नगर ते माइंड स्पेस मालाड १.६६ किलोमीटर २९१० कोटी गोरेगाव वरून रस्ता ४.४ किलोमीटर
- तिसरा टप्पा माइंड स्पेस मालाड ते चारकोप 3.9 किलोमीटर 2910 कोटी
- चौथ्या टप्प्यात चारकोप ते माईन स्पेस मालाड 2991 कोटी 3.9 किलोमीटर
- पाचवा टप्पा चारकोप ते गोराई ३.८ किलोमीटर 2990 कोटी
- सहावा टप्पा गोराई ते दहिसर ३.७ किलोमीटर 2612 कोटी